करटोली लागवड Part २

हवामान

करटोली हे उष्ण व दमट हवामानात चांगले येते. करटोलीच्या चागल्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी भरपुर सुर्यप्रकाशाची आवश्यकता असते. करटोलीसाठी तापमान २७ ते ३२ अंश सेल्सियस आवश्यक असते, तापमान कमी झाल्यास वेलीची वाढ खुंटते व उत्पादनास घट येते. या पिकासाठी फळधारणेरच्या काळात हवेत ८० टक्के आर्द्रता असणे आवश्यक आहे.

जमीन :

करटोली हे पीक हलक्या ते मध्यम जमीनीत चांगले येते. लागवडीसाठी डोंगरउताराची व सेंद्रीय पदार्थ भरपुर असणारी आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन योग्य आहे. जमीनीचा सामु५.५ ते ७.० असावा. हलक्या जमीनीत अन्नद्रव्य तसेच ओलावा धरून ठेवण्यांची क्षमता कमी असल्यामुळे त्याना खताद्वारे अन्नद्रव्याचा द नियमित पाण्याचा पुरवाठा करावा. या पिकासाठी क्षारपड, चोपण, दलदलीची जमीन निवडू नये कारण अशा जमीनीत पीकाची वाढ होत नाही व कंद कुजण्याचा संभव जास्त असतो.

करटोलीच्या जाती :

१) इंदिरा कंकोडा १:- ही जात इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ, छत्तीसगड येथे विकसीत केली आहे. या जातीची फळे आकाराने मोठी असून गडद हिरव्या रंगाची असतात. एका फळाचे वजन १४ ते १६ ग्रॅम आकाराचे असते.

२) इंदिरा कंकोडा २ :- ही जात इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ, छत्तीसगड येथे विकसीत केली आहे. या जातीची फळे फिक्कट हिरव्या रंगाची असून अंडाकृती आकाराची असतात एका फळाचे वजन १८ २० ग्रॅम आकाराचे असतात.

३) अर्का भारत :- ही जात इंडीयन इस्टीट्यूट ऑफ हॉर्टीकल्चर रिचर्स बंगळूरू येथे विकसीत केली आहे. या जातीची फळे आकाराने लांबट, हिरव्या रंगाचे असून एका फळाचे वजन साधारण २० ते ३० ग्रॅम आकाराची असतात. एका वेलीपासून साधारण २ ते ३ किलो फळे मिळतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *