रानभाजी: करटोली/ कंटोली/ रानकारली दीर्घायुषी भाजी

शास्त्रीय नाव: Momordica dioica

कुळ : cucurbitaceae

करटोली या वनस्पतीला करटोली, कंटोली, रानकारली, करटुली अशीही स्थानिक नावे आहेत. करटोलीला वाइल्ड करेला फ्रुट असे म्हणतात. करटोलीचे वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम घाट व पश्चिम महाराष्ट्र परिसरात आढळतात. करटोलीचे वर्षायू वेल जंगलामध्ये झुडपांवर वाढलेले आढळतात. या वेलींना जमिनीत कंद असतात. कंद बहुवर्षाय असून अनेक रोगांवर गुणकारी आहे.

ओळख:

खोड: : नाजूक आधाराने वर चढणारे

पाने: साधी, एकाआड एक रूंद, अंडाकृती, हृदयाकृती ३ ते ५ विभागीय, ३ ते १० से.मी लांब, ३०५ ते ९ से.मी रूंद, कडा दातेरी, पानांच्या बेचक्यातून तयार होतात व वेलींना वर चढण्यास मदत करतात. पानांचा देठ १.२ ते ३ सेंमी लांब.

फुले: पिवळी, नियमित, एकलिगी नर व मादी फुले वेगवेगळया वेलींवर येतात. फुले

पानांच्या बगलेतून एकांडी येतात, पाकळया ५, एकमेकास चिकटलेला पुंकेसर. फळे: लंबगोलाकार, ५ ते ७ सेंमी लांब फळांवर नाजूक अनेक, तांबडया गरात लगडलेल्या. काटयांचे आवरण, बिया

औषधी उपयोग :

१. करटोलीच्या स्त्रीजातीच्या वेलीचे कंद औषधात वापरतात.

२. करटोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. डोकेदुखीत पानांचा अंगरस, मिरी, रक्तचंदन आणि नारळाचा रस एकत्र करून डोक्याला चोळतात.

३. डोक्याचा त्रास, मुतखडा सर्व प्रकारची विषबाधा, हत्तीरोग या विकारांत कंदाचा वापर करतात.

४. करटोलीचे भाजलेले कंद मूळव्याधीत रक्तस्राव थांबविण्यास आणि आतडयांच्याखावी तक्रारीत उपयोगाचे आहे.

५. करटोलीचे फळ कडू, उष्ण, संसर्गरक्षक आहे. वात, कुष्ठरोग, मूत्रस्राव व मधुमेहात करटोलीची फळे उपयुक्त आहेत.

६. अती लाळ सुटणे, मळमळ, ह्यदयाचे त्रास यातही करटोली गुणकारी आहे. रक्तरोग, डोळयांचे रोग या विकारांत करटोलीचा वापर करतात. कच्चे फळ भाजी म्हणून वापरतात. हे तापातून उठलेल्या रोग्यास पोषक म्हणून देतात.

७. करटोलीची भाजी रूचकर असून पोट साफ होण्यासाठी, यकृतातून पित्ताचा स्त्राव नीट होण्यासाठी उपयुक्त आहे. मधुमेहाच्या रूग्णांनी या भाजीचे नियमीत सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते, त्याचबरोबर लघवीतील शर्कराही नियंत्रित होते. ज्यांना मूळव्याधीतून वरचेवर रक्तस्त्राव होतो, वेदना होते अशासाठी ही भाजी अत्यंत हितकारक आहे.

८. सर्दी, खोकला, ताप या पावसाळयातील विकारांवर करटोलीची भाजी हितावह आहे.

९. त्वचारोग होऊ नयेत म्हणून ही भाजी अवश्य खावी. 

वरील माहिती रानभाज्या आणि त्यांच्या पाककृती, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड, डहाणू यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातून घेण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *