एकदा बनवून पाहावा असा पौष्टिक पदार्थ-सत्तू छाछ

सत्तू छाछ ….

सत्तू हा प्रकार खरं तर उत्तर भारतातला.

पौष्टिक आणि पचायला हलका असणारा हा पदार्थ आपल्याकडे कुणाला फारसा माहित नाही.

सत्तूचे दोन मुख्य प्रकार आहेत.

1) हरभरे,गहू आणि जव  ही धान्ये भाजून,भिजवून वाळवली जातात आणि मग त्याच पिठ बनवलं जात.

हा सत्तू पराठे बनवण्यासाठी वापरला जातो.

घरी नाष्ट्यासाठी किंवा प्रवासात जेवणाला पर्याय म्हणून हा सत्तू वापरला जातो.

सत्तूच्या पिठात साखर,पाणी मिसळलं की लापशी सारखा मिठा सत्तू तयार होतो.

याच पिठात लाल तिखट ,मिठ आणि पाणी मिसळलं की सांजा प्रमाणे नमकीन सत्तू तयार होतो.

दोन्ही खायला मजेशीर आणि पोटभरीला उत्तम असतात.

2) चना सत्तू …

भाजलेल्या हरभऱ्याचं पिठ म्हणजे चना सत्तू.

आपल्याकडे जे फुटाणे मिळतात ना त्यांचं साली सकट मिक्सर मध्ये तयार केलेलं पिठ म्हणजे चना सत्तू.

घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवला तर हा चना सत्तू दोन तीन महिने सहज टिकतो.

हे फुटाणे भाजलेले असतात, पचायला हलके असतात आणि साली सकट पिठ बनवलेलं असतं म्हणून त्यात फायबर्स असतात.

हे पिठ खाल्लं तर बाधत नाही.

पोट पण साफ होतं.

आता आपलं सत्तू छाछ कस बनवायचं ते बघा —

एक ग्लास थंड ताक घ्यायचं त्यामध्ये दोन टेबल स्पून चना सत्तू आणि एक सपाट टी स्पून ताक मसाला मिसळायचा चमच्यानं नीट हलवून मिक्स करायचं आणि त्यावर चिरलेली कोथिंबीर टाकली की झालं आपलं झटपट सत्तू छाछ तयार!

 उन्हाळ्यात बाहेरून आलं आणि हे एक ग्लास सत्तू छाछ घेतलं की भूक आणि तहान दोन्ही शांत होण्याची हमखास गॅरंटी.

आपण थंड लिंबू सरबत बनवतो त्यात एका ग्लासला दोन टेबल स्पून  चना सत्तू मिळाला की मस्त दाट सत्तू सरबत पण बनवता येत.

मग वाट कशाची बघायची ..

कर के देखो!

— डॉ. दिलीप कदम

अक्षर मानव जन आरोग्य केंद्र,बार्शी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *