रानभाजीः शेवळा/ शेवळी

शास्त्रीय नाव: Amorphophallus commutatus कुळ : Araceae

शेवळा ही वर्षायू कंदवर्गीय वनस्पती आहे. महाराष्ट्रात शेवळा ही वनस्पती कोकण, पश्चिम महाराष्ट्र व अकोला येथील जंगलात आढळते. ओळखः

कंदः रोपवर्गीय वनस्पतीचा कंद जमिनीत असतो. आकार गोल चपटा किंवा गोलाकार- उभट असतो. कंद गडद, करडया किंवा तांबुस- करडया रंगाचा असतो

पानः पावसाळयात जमीनीत असणाऱ्या कंदापासून पान तयार होते. पानाचा देठ ६० ते ८० सेमी. लांब असतो. औषधी उपयोगः

१. कंदाची पाने दूध आणि साखरेबरोबर वाजीकरणासाठी देतात यामुळे मुत्रमार्गास उत्तेजन येते.

२. शेवळा थोडा खाजरा असल्यामुळे काकड या फळाचा वापर करतात.काकड

फळामुळे भाजी खाजत नाही शेवळा:

शेवळया सोबत काकड फळाचा वापर होतो. शेवळयाचे कंद व कोवळी पाने भाजीसाठी वापरतात. शेवळा थोडा खाजरा असतो म्हणून सोबत काकड या वनस्पतीची आंबट फळे घालतात. काकड फळाचा रस काढतात. या रसामुळे भाजी खाजत नाही. ही फळे आवळयासारखी दिसतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *