मिठ्ठा – नमकीन बिट पंच …
बिट हा एक असा कंद आहे जो एनिमिया,ब्लडप्रेशर,डायबिटीस, हार्टडीसीज ह्या विकारांवर प्रभावी आहे.
बिटा मध्ये अगदी मनलुभावन नैसर्गिक रंग असतो.
बिट नुसतं चिरलं तरी रंग हाताची साथ करायला लागतो.
बरेच लोक कच्चं बिट वाटून त्याचं सरबत करतात.
पण आमची कृति जरा हटके आहे.
एक मध्यम आकाराच्या बिटाचं साल काढून घेऊन कुकर लावताना डाळ भाता बरोबर उकडून घ्यायचं.
उकडलेलं बिट थंड झालं की त्याचे काप करून मिक्सर मधुन फाईन पेस्ट करून घ्यायची.
ही पेस्ट स्टीलच्या डब्यात किंवा काचेच्या बरणीत भरून फ्रीज मध्ये ठेवून द्यायची.
सरबत करायचं असेल तेव्हा दोन टेबलस्पून बिट पेस्ट आणि एक टेबलस्पून लिंबू रस ग्लास मध्ये घेऊन थंड पाणी घातलं की झालं बिटाचं सरबत तयार.
बिटाला आंगचीच गोडी असते त्यामुळे वेगळी साखर मिसळायची गरज नाही.
तुम्हाला गोडसर हवं असेल तर आवडी नुसार साखर किंवा गुळ मिसळू शकता.
हा झाला मिठ्ठा बिट पंच.
आमचे फेसबुक फ्रेंड प्रसाद घळसासी यांनी सुचवल्या प्रमाणे अजून एक प्रकार करून बघितला …
एक ग्लास ताका मध्ये दोन टेबलस्पून बिटाचा गर आणि ताक मसाला मिसळून बघितला.
नमकीन बिट पंच मस्त तयार झाला.
मग काय करून बघा की बिट पंच!
— डॉ. दिलीप कदम
अक्षर मानव जन आरोग्य केंद्र,बार्शी
मो.नं. 9423066330