भारताचा बर्गर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, महाराष्ट्रात तयार झालेल्या वडापावचा जनक कोण?
समाज माध्यमां मध्ये अनेक पोस्ट मधुन वेगवेगळ्या लोकांची नाव जाहीर केली पण खरी हकीकत कुणालाच माहित नाही.
महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर त्यावेळी शिवसेनेचा नुकताच उदय झाला होतो.
अनेक तरुणांनी स्वतःला शिवसेनेच्या कार्यात झोकून दिलं.
त्यातलाच एक कार्यकर्ता होता भायखळ्याच्या चंद्रकांत आळेकर.
नोकरी सोडून शिवसैनिक झाला.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभा राहिला आणि पडला.
आता पोटापाण्यासाठी पुढं काय करायचं?
चंद्रकांतनं भायखळा पुर्वेला खाद्यपदार्थांची हातगाडी सुरू केली.
तिथचं वडापाव हा नवीन पदार्थ तयार झाला.
पोलिसांनी त्रास देऊ नये म्हणून गाडी वर बोर्ड लावला होता,
“शिवसेना पुरस्कृत वडापाव”
हा पदार्थ लोकांच्या पसंतीला उतरला आणि तरुण पोरांना पण आयडिया आवडली.
मुंबईत नाक्या नाक्यांवर शिवसेना पुरस्कृत वडापावच्या गाड्या दिसायला लागल्या.
एका नवीन रोजगाराचा जन्म झाला.
वडापावची पुढची घोडदौड सगळ्यांनाच माहित आहे.
कोरोना लॉक डाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तेव्हा या वडापावनंच अनेकांना तारलं.
वडापावचा जनक — चंद्रकांत आळेकर
जेष्ठ पत्रकार मित्र भाऊ तोरसेकर याच्या कडे असे अनेक संदर्भ आहेत. त्याच्या बरोबर फोन वर गप्पा मारताना ही माहिती मिळाली.
लेखक — डॉ. दिलीप कदम
अक्षर मानव जन आरोग्य केंद्र,बार्शी
मो.नं. 9423066330