जंगलातील गावठी अवाकॅडो -पेंढारी/पेंढरं

रानभाजी : पेंढारी

शास्त्रीय नाव: Tamilnadia uliginosa

कुळ : Rubiaceae

पेंढर ही वनस्पती जंगलामध्ये आढळते. ओळखः

खोडः खोडाचा घेर लहान असतो. साल तांबूस तपकीरी रंगाची;, साधारण खडबडीत फांदया.

फुले: फुले पांढरी, आकर्षक, पानांच्या बेचकातून येतात.

फळे: फळे गोलाकार अंडाकृती, लंबगोलाकार पेरूसारखी दिसतात. फळे पिकल्यावर पिवळी, बिया अनेक, गरास लगडलेल्या.

औषधी गुणधर्मः

१. पेंढराचे कच्चे फळ औषधात वापरतात.

२. पेंढराच्या कच्चा फळांची भाजी बिया न घेता करतात. फळांच्या टरफलाची व गराची भाजी करतात.

३. पेंढराची भाजी थंड गुणधर्माची आहे.

४. पोटात कळ मारून जुलाब होत असल्यास, आंव पडत असल्यास पेंठरीच्या कच्च्या फळांची भाजी देतात.

५. लघवी कमी होत असल्यास, लघवीची जळजळ होत असल्यास पेंढरीच्या भाजीचा चांगला उपयोग होतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *