वाल कोरेल भाजी
साहित्य
मोड आलेले वाल 1 वाटी
कोरेल 2 वाटी
कांदा मध्यम आकाराचा 1
आले अर्धा इंच
लसूण ६ पाकळ्या
हिरवी मिरची 2
लाल तिखट 1 चमचा
हळद अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
पाणी अर्धा कप
जिरे पाव चमचा
तेल १ चमचा
कृती
सर्वप्रथम मोड आलेले वाल सोलून घ्या. वालामध्ये अर्धा कप पाणी घालून कुकरमध्ये २ शिट्ट्या घ्या.
कोरेलची कोवळी पाने घ्या. देठ काढून घ्या. कोवळे देठ घेतले तरी चालतील. पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी.
आले, लसूण, मिरची एकत्र ठेचून जाडसर वाटण करून घ्यावे. कढईत तेल गरम करून त्यात जिरे घाला. जिरे तडतडल्यावर त्यात वाटण, कांदा परतून घ्या. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात लाल तिखट, हळद, वाल घालून एकत्र करावे. अर्धा कप पाणी घालून झाकण ठेवून थोडे शिजवावे.
वाल शिजत आले की त्यात कोरेल घाला. मीठ घालून पुन्हा झाकण ठेवून वाफ आणावी. ३-४ मिनिटे शिजवावे. गॅस बंद करावा. गरम भाकरी किंवा आमटी/वरण भाताबरोबर सर्व्ह करावे.