रानभाजी : कुरडू

शास्त्रीय नाव: Leea macrophylla

कुळ : Amarantceas

कुरडू ही रानभाजी अमरॅन्टसी या कुळातील आहे. शेतात आणि ओसाड रानावर वाढणारे हे तण आहे. पावसाळयाच्या

सुरवातीस वाढणाऱ्या कोवळया पानंचा वापर

पालेभाजी म्हणून केला जातो.

औषधी उपयोगः १. झोप येण्याचे औषध म्हणून या च्या पाल्याच्या भाजीचा वापर केला जातो.

कुरडूची भाजी:

साहित्यः

कांदा १

हळद १ चमचा

कुरडू १ जुडी

लाल तिखट १ चमचा

मीठ चवीनुसार

ओले खोबरे चवीनुसार

तेल २ चमचे

हिरवी मिरची २-३

लसूण पाकळया ४-५

१. सर्वप्रथम कुरडूची कोवळी पाने निवडावीत ती स्वच्छ धुवून घ्यावीत व त्यानंतर ती बारीक चिरून घ्यावीत.

२. त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत भाजणे. त्यात लसूण मिरचीचा ठेचा टाकणे. थोडावेळ परतून घेणे व नंतर मीठ, हळद व मसाला टाकणे.

३. त्यानंतर चिरलेली कुरडूची पाने फोडणीत टाकावी व २ मिनटे वाफेवर शिजू द्यावी.

४. भाजी झाल्यानंतर त्यात ओले खोबरे घालावे.

५. मिश्रण चांगले हलवून मंद आचेवर भाजी वाफेवर शिजू द्यावी.

सौ. निकीता लहाणू दळवी कैनाड, मुळपाडा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *