दुधापेक्षा चारपट कॅल्शियम आणि दुप्पट प्रथिने असणारा अतिशय गुणकारी शेवगा

रानभाजी : शेवगा

शास्त्रीय नाव: Moringa oleifera

कुळ : Moringaceae

मोरिंगा प्रजातीतील सर्वाधिक आढळणाया जातीची वनस्पती असून उष्ण कटिबंधीय व समशितोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी. उंचीपर्यत वाढतो. यांच्या फुले, पाने तसेच शेंगाचा पाककृती बनवण्यासाठी वापर होतो.

औषधी उपयोगः

१. शेवग्यामध्ये दूधापेक्षा चारपट अधिक कॅल्शियम आणि दोनपट अधिक प्रथीने हे पोषकद्रव्य असतात.

२. कोवळया पानांची भाजी आतडयांना उत्तेजना देवून पोट साफ करते. त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी फायदा होतो..

३. शेवग्याच्या पानात हप्रिट्रीगोस्पेरमीन नावाचे तत्व असते ते जीवाणू प्रतिबंधक म्हणून कार्य करते. हयाच्या पुढे ह्रएचपायलोरी हा जीवाणू निष्प्रभ होतो तसेच आतडयातील जखमा व व्रण बर करण्यासाठी ही भाजी खूप उपयुक्त ठरते.

४. हाडे ठिसूळ होणे, वजन जास्त वाढणे, आळस, असणाऱ्यांनी ही भाजी मुबलक खावी.

५. शारीरीक, मानसीक थकवा दूर होतो.

६. डोळयांसाठी उपयुक्त अशी भाजी. फुलांची भाजी संधिवात व स्नायूंचे कमजोरी चे आजार साठी उपयोगी आहे तसेच उत्तम कृमिनाशक आहे.

७. शेवगा दोन प्रकारचा आहे.पांढरा व काळा यापैकी काळा जास्त उग्र आहे. यांच्या मुळाच्या सालीची पावडर २ ते ३ ग्रॅम प्रमाणात अधून मधून येणारा ताप, फिटस, संधिवात, सूज, जुलाब, खोकला, दमा वाढली असता वापरावी.

८. मूतखडा झाला असता शेवगा हा उपयुक्त ठरतो त्यामुळे लघवीवाटे तो बाहेर पडतो. शेवग्याच्या शेंगाची भाजी पेटातील कृमी होऊ नयेत व झालेले नष्ट व्हावेत यासाठी खावी.

१०. पचनक्रियेशी संबंधित आजार शेवगा सेवनाने नष्ट होतात.

११. शेवगा खाल्यामुळे चेहरा उजळतो व पिंपल्सची समस्या दूर होते.

शेवग्याच्या पानांचे भानोळ (वडया):

साहित्य:

बारीक चिरलेला शेवग्याचापाला ३ वाटी

बारीक चिरलेला कांदा १ वाटी

ओल्या नारळाचा कीस १ वाटी

शेंगदाण्याचा कूट १ वाटी

आल मिरची कोंथीबीर लसुण पेस्ट २ चमचे

लाल मिरची पावडर, मीठ, हळद, गरम मसाला १ चमचा

बेसन १ वाटी

तांदळाची पीठी २ वाटी

तेल २ चमचे

बारीक चिरलेली कोंथीबीर व कडीपत्ता

कृती :

१. प्रथम वरील दिलेल्या सर्व वस्तू एकत्र करून हाताने मळून व्यवस्थितीत एकजीव कराव्यात.

२. नंतर कुकर किंवा जाडबुडाच्या पातेल्याला थोड तेल लावून त्यात मिश्रण घालावे व हाताने व्यवस्थितीत करावे .

३. नंतर कुकर असेल तर शिटी काढून मंद आचेवर ठेवावे वरून एखादे झाकण ठेवावे.

४. आतल्याआत ते शिजते. २० मिनिटाने गॅस बंद करावा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापाव्यात व शॅलो फ्राय कराव्यात.

सौ. ज्योती सुभाष सावे

डोंगरीपाडा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *