रानभाजी : आंबुशी

शास्त्रीय नाव: Oxalis corniculata

कुळ : Oxalidaceae

आंबुशी या वनस्पतीला आंबुटी, आंबेती, चांगेरी अशीही स्थानिक नावे आहेत. आंबोशीला इंग्रजीमध्ये सॉरेल असे म्हणतात. हे प्रामुख्याने ओलसर जागेत तसेच कुंडयातून वाढणारे तण आहे.

ओळख:

खोडः नाजूक गोलाकार, पसरट वाढणारे, खोडाच्या पेरापासून तंतुमय मुळे तयार होतात.

पाने: संयुक्त, एकाआड एक, त्रिपर्णी, त्रिकोणी आकाराच्या

फुले: पिवळी, नियमीत, पानाच्या बगलेतून येतात. फुले टोकावर येतात, टोकाकडे गोलाकार, आयताकृती, पुंकेसर १०

फळे : बोंडवर्गीय, लांबट गोलाकार, रेषाकृती, पंचकोनी, बिया अनेक

औषधी उपयोगः

१. आंबुशी गुणाने रूक्ष व उष्ण आहे. ही वनस्पती पचनास हलकी असून चांगली भुकवर्धक आहे. ही पित्तशामक, रक्तसंग्राहक आहे.

२. कफ, वात आणि मूळव्याध यांवर आंबुशी गुणकारी आहे. ही वनस्पती आमांश, त्वचारोग, अतिसार आणि तापात उपयुक्त आहे.

३. आंबुशीची पाने आमांश आणि स्कर्व्हींत वापरतात. आमांशात पानांचा रस, मध आणि साखर यांच्या बरोबर देतात.

४. कोवळया पानांचा तापात उत्तम औषध आहे.

५. ताज्या पानाची कढी अपचनाच्या रोग्यांना पाचक आहे. अपचनावर आंबुशी उत्तम औषध आहे.

६. आंबुशी पाण्यात वाटून उकळून कांदयाबरोबर पित्तप्रकोपात डोके दुखण्यावर लावतात.

७. आंबुशी वाटून सुजेवर बांधल्यास दाह कमी होऊन सूज उतरते.

आंबुशी भाजी:

साहित्य:

आंबुशीची पाने २ वाटी

कांदा 1 वाटी

लसूण १ चमचा

शेंगदाणा कूट २ चमचे

ओली मिरची २-३

गूळ अर्धा चमचा

तिखट २ चमचे

मीठ चवीनुसार

तेल २ चमचे

१. पाने स्वच्छ धुवून चिरून घ्यावीत.

२. तेलात कांदा परतून त्यामध्ये लसून, ओली मिरची चिरून घालणे किंवा तिखट घालणे.

३. थोडा गूळ, शेंगदाणा कूट घालून भाजी परतणे.

४. आवश्यकते प्रमाणे भाजीला मीठ घालून भाजीला वाफ देणे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *