रानभाजी : नळीची भाजी

शास्त्रीय नाव: Ipomoea aquatica

कुळ: Convolvulaceae

नळीची भाजी ही वनस्पती तळी व तलावांच्या शेजारी, काठांवर, पाणथळ , ओलसर जमिनीवर, दलदलीच्या ठिकाणी वाढलेली आढळते. नळीची भाजी ही वर्षायु किंवा द्विवर्षायू वेलवर्गिय वनस्पती आहे. या वनस्पतीचे वेल जमिनीवर पसरत वाढतात.

ओळख:

खोडः नाजूक, लांब, चिखलावर सरपटणारे किंवा पाण्यावर तरंगणारे पोकळ असते. पेरांजवळ मुळे फुटतात.

फुले: द्विलिंगी, नियमित १३ ते १०० सें.मी लांबफुलांचे देठ २.५ ते ५.० सें.मी लांब, पाकळया पाच असतात.

फळे: बोंडवर्गीय, बिया २ ते ४

औषधी गुणधर्मः

१. या वनस्पतीचे संपूर्ण अंग औषधात वापरतात.

२. नळीची भाजी दुग्धवर्धक व कृमिनाशक गुणधर्माची आहे.

३. पांढरे डाग, कुष्ठरोग, पित्तप्रकोप आणि तापात ही वनस्पती उपयुक्त आहे तसेच कफ व वातवर्धक आहे.

४. ही वातानुलोमक असून दाह कमी करते.

५. कावीळ, श्वासनलिका दाह व यकृतविकारात या वनस्पतीचा वापर करतात.

६. खियांना मानसिक आणि सामान्य दुर्बलता आलेली असल्यास ही वनस्पती शक्तीवर्धक म्हणून देतात.

७. नागिणीच्या उपचारात ही वनस्पती वापरली जाते.

नाळ भाजी:

साहित्यः

नळी भाजी १ जुडी

मुग १ वाटी

कांदा १

टोमॅटो १

मिरची २ ते ३

हळद, लाल तिखट, गरम मसाला १ चमचा

तेल २ चमचे

मीठ चवीपुरते

कृती:

१. नळी भाजी साफ करून घ्यावी.

२. भांडयात तेल चांगले गरम करून त्यावर राई, जिरे व हिंग टाकावा

३. त्यावर मिरची व कांदा घालून परतवावा. हळद टाका.

४. यानंतर चिरलेली भाजी फोडणीत टाकून ती परतावावी व मुग टाकावे.

५. भाजीवर झाकण ठेवून ५ मिनेट मध्यम आचे वर शिजू दयावे.

६. भाजी शिजली की त्यावर मिठ टाकावे व नंतर खोबरे घालून चांगले मिक्स करावे.

७. २ मिनेटे भाजी शिजू दया व नंतर गॅस बंद करून टाका. (नळी भाजीत सोललेली वाल, चींच गुळ घालून आमटी सुध्दा छान बनते.)

सौ. शितल यज्ञेश सावे बोरीगाव

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *