अमुल बटर घरच्या घरी …

माझे खाद्याचे प्रयोग …

अमुल बटर घरच्या घरी …

आज आमच्याकडे पाव भाजीचा बेत होता.

भाजी सगळे जण बनवतात तशीच पाव पण अर्थात नान्नजकर बेकरी मधून आणलेले ताजे गरमा गरम.

पण अमुल बटर शिवाय पाव भाजीला मूल्यच नाही.

अमुल सारखं सेम बटर आम्ही घरीच बनवतो.

ही आयडियाची कल्पना अगदी सोप्पी आहे.

आपण लोण्याला गरम करून तुप बनवतो.
मग तुपाला गारवा दिला तर लोणी तयार होईल की नै!

तर करायचं काय की..

गायीचं तुप बाऊल मध्ये घ्यायचं बरं का.
त्यात चिमुटभर हळद आणि चिमूटभर मिठ घालायचं.

मग दोन तीन आईस क्यूब घालून चमचानं चांगलं फेटत रहायचं.

पाच मिनिटात बटर तयार होतं.

बाऊल मधे उरलेल्या आईस क्यूब काढून टाकायच्या आणि पाणी पाणी निथळलं की झालं मस्त बटर तयार.

हे बटर वाटीत भरून अर्धा तास डीप फ्रीज मध्ये ठेवायचं.

ताबडतोब वापरायचं नसेल तर चौकोनी डिश मध्ये सेट करून आपण सिल्वर पेपर मधे रॅप करून फ्रीज मध्ये साठवून पण ठेऊ शकतो.

अमुल सारखं बटर घरच्या घरी!

करून तर बघा.

डाॅ. दिलिप कदम, बार्शी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *