माझे खाद्याचे प्रयोग .
झटपट दहीवडा
बेकरी मधुन मोठे जीराबटर आणायचे.
एका मोठ्या बाऊल मध्ये साधे पाणी घेऊन त्यात हे बटर पाच मिनिटे बुडवून ठेवायचे.
हलक्या हाताने बटर काढून हलकेच दाबून पाणी काढून टाकायचं.
हे बटर प्लेट मध्ये ठेवून त्यावर साखर मिसळलेल दही, हिरवी चटणी,मिठ, लाल तिखट आणि चाट मसाला टाकायचा.
मग हा झटपट दहीवडा फस्त करायचा.
माझेखाद्याचेप्रयोग
झटपट_दही वडा
