आज रविवार कामाचा दिवस –
यावर्षी उन्हाळा लवकर सुरू झाला.
आणि उन्हाळा म्हणलं की घामोळ्या आणि घर्मगंध येणार हे नक्की.
बाजारात केमिकल युक्त पावडरी आणि डिओ आले सुद्धा.
पण आपण बनवायची आहे आयुर्वेदिक पावडर.
त्यासाठी लागणारे साहित्य –
संगजीरा पावडर – 100 ग्रॅम
चंदन पावडर 50 ग्रॅम
कडूनिंब पत्र पावडर – 50
तुरटी – 25 ग्रॅम
मेंथॉल – 10 ग्रॅम
हे सगळं साहित्य पनसाऱ्याचा दुकानात मिळेल.
वरच्या तीन पावडरी तयार मिळतात.
तुरटीची लाही करून घ्या.
ही लाही आणि मेंथॉल एकत्र करून मिक्सर मधून पावडर करून घ्या.
आता सर्व पावडरी एकत्र करून एकजीव मिश्रण करा.
हे मिश्रण वस्त्रगाळ करून घेतले की झाली आपली पावडर तयार.
थोडासा चाळ शिल्लक राहतो तो कापडात पुरचुंडी करून बाथरूमच्या खिडकीत ठेऊन द्या.
मस्त सुगधं येत राहतो.
आपली पावडर एका जुन्या डब्यात भरून ठेवा.
या पावडरला मस्त चंदनाचा सुगधं असतो म्हणून हिला चंदना पावडर नाव दिलं आहे.
ही पावडर उन्हाळ्यात डस्टिंग पावडर म्हणून वापरा.
हीच पावडर फेस पावडर म्हणून आपली तर तेलकट चेहरा पांढरा फटक न दिसता छान नॅचरल स्किन कलर येतो.
डाॅ. दिलीप कदम, बार्शी