रानभाजीः शेवळा/ शेवळी
शास्त्रीय नाव: Amorphophallus commutatus कुळ : Araceae शेवळा ही वर्षायू कंदवर्गीय वनस्पती आहे. महाराष्ट्रात शेवळा ही वनस्पती कोकण, पश्चिम महाराष्ट्र व अकोला येथील जंगलात आढळते. ओळखः कंदः रोपवर्गीय वनस्पतीचा कंद जमिनीत असतो. आकार गोल चपटा किंवा गोलाकार- उभट असतो. कंद गडद, करडया किंवा तांबुस- करडया रंगाचा असतो पानः पावसाळयात जमीनीत असणाऱ्या कंदापासून पान तयार होते. …