रानभाजी : भारंगी
शास्त्रीय नाव: Clerodendrum.serratum कुळः verbenaceas भारंगी ही वनस्पती व्हर्बेनेसी म्हणजेच निर्गुडीच्या कुळातील आहे. भारंगीचे झुडूप तीन ते पाच फुटापर्यत उंच वाढते. भारंगीची झुडपे डोंगरउतारावर, खुरटया जंगलात नदीनाल्याच्या काठावर, शेतात सर्वत्र आढळतात. पावसाळयाच्या अखेरीस भारंगीस फुले, फळे येतात. मुळांच्या सकर्सपासून व बियांपासून भारंगीची लागवड करता येते. ओळख: पाने: साधी समोरासमोर किंवा तीन पाने मंडलामध्ये, १० ते …