रानभाजी : आंबुशी
शास्त्रीय नाव: Oxalis corniculata कुळ : Oxalidaceae आंबुशी या वनस्पतीला आंबुटी, आंबेती, चांगेरी अशीही स्थानिक नावे आहेत. आंबोशीला इंग्रजीमध्ये सॉरेल असे म्हणतात. हे प्रामुख्याने ओलसर जागेत तसेच कुंडयातून वाढणारे तण आहे. ओळख: खोडः नाजूक गोलाकार, पसरट वाढणारे, खोडाच्या पेरापासून तंतुमय मुळे तयार होतात. पाने: संयुक्त, एकाआड एक, त्रिपर्णी, त्रिकोणी आकाराच्या फुले: पिवळी, नियमीत, पानाच्या बगलेतून …