गुडदाणीचे दिवस ….
गुडदाणीचे दिवस … आमच्या लहानपणी यांव होतं आन त्यांव होतं असं म्हणायची सवय बऱ्याच लोकांना असते. मला पण आहे.कारण ते दिवस विसरताच येणार नाहीत. हल्लीच्या पोरांचं कचकड्याचं बालपण बघितलं की त्या दिवसातल्या प्रत्येक गोष्टीची हटकून आठवण होतेच होते. ते आभावाचे पण किमान अपेक्षांचे दिवस होते.अपेक्षा किमान तर अपेक्षाभंगाचे क्षण पण कमी म्हणून थोडक्यात भरपूर आनंद …