बोंबील (बॉम्बे डक Bombay Duck)

बोंबील फ्राय
साहित्य :
बोंबील 5
हिरवी मिरची (तिखट) 2
लसूण पाकळ्या 6 ते 7
आले अर्धा इंच
कोथिंबीर अर्धा मूठ
आगरी मसाला 1.5 टीस्पून
हळद अर्धा टीस्पून
रवा 2 टेबलस्पून
तांदळाचे पीठ 1 टेबलस्पून
मीठ चवीनुसार
तेल तळण्यासाठी

कृती :

  1. बोंबील साफ करून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या. मधोमध चिरून घ्या. मोठे बोंबील असल्यास दोन तुकडे करू शकता, लहान असतील तर अख्खे ठेवा.
  2. बोंबील थोडे निथळू द्या. बोंबीलातले पाणी पूर्ण निथळल्यास ते क्रिस्पी होतात. बोंबील एका ताटात पसरवून त्यावर वजन पोळपाट किंवा पाटा ठेवल्यास पाणी निथळायला मदत होते.
  3. मिरची, कोथिंबीर, आले, लसुण एकत्र करून वाटण करून घ्या. खलबत्ता अथवा पाट्यावर वाटण केल्यास जास्त चांगली चव येते. बोंबील टेस्टी बनतात.
  4. बोंबील पिळून घेऊन त्यावर आगरी मसाला, हळद, मीठ, ओले वाटण व्यवस्थित चोळून घ्या.
  5. दुसर्‍या ताटात रवा, तांदळाचे पीठ, किंचित मीठ घालून एकत्र करा.
  6. आता तवा तापायला गॅसवर ठेवा. तापल्या नंतर त्यात 2 टीस्पून तेल घाला. बोंबील शॅलो फ्राय करणार असल्याने जास्त तेल घालू नये.
  7. बोंबील रवा पीठ मिश्रणात व्यवस्थित घोळवून तव्यात फ्राय करायला ठेवा. गॅसची आच मध्यम ठेवा. आच मोठी ठेवल्यास मसाला करपून जातो.
  8. 2-3 मिनिटात किंवा खालची बाजू क्रिस्पी झाल्यावर बोंबील पलटून वरची बाजू फ्राय करून घ्या. गरज वाटल्यास अर्धा टीस्पून तेल घाला.
  9. दोन्ही बाजूने क्रिस्पी झाल्यावर सर्व्ह करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *