माझे खाद्याचे प्रयोग – स्प्रिंग ओनीयन चिकन

माझे खाद्याचे प्रयोग –

स्प्रिंग ओनीयन चिकन –

रविवार असतो आणि आपण दुपारी चिकन भाकरीचा फक्कड बेत पार पाडलेला असतो.

तरीही चिकनचं कोरड्यास थोडसं शिल्लक रहातच.
आता ते थोडसं म्हणजे किती तर दातात अडकेल इतपत तीन चार तुकडे आणि अर्धा वाटी रस्सा.
हे संपवायची जबाबदारी आपल्यावर असते.

कारण संध्याकाळचा स्वयंपाक करायचा नाही अशा बेतानच बायकोनं भाकऱ्या आन भात दुपारीच केलेला असतो.
आता तिने रात्रीसाठी फक्त स्प्रिंग ओनीयन म्हणजे कांद्याच्या पातीची भाजी तिच्यासाठी तयार केलेली असते.

मग आता आपण करायचं काय की …

आपल्या शिल्लक चिकन मधली हाडं काढून बोनलेस करून बारीक बारीक बोट्या करून घ्यायचा.
आरोग्यदायक लोखंडी तवा गॅसवर गरम करायचा त्यावर आपले चिकन तुकडे – रस्सा टाकून गरम करायचा आणि त्यात कांद्याच्या पातीची तेवढीच भाजी मिसळायची.
सगळं तयारच असतं म्हणून खाता येईल एवढंच गरम करून डिशमध्ये घ्यायचं.

दुपारची कडक भाकरी,स्प्रिंग ओनीयन चिकन,कांदा, काकडी असा रात्रीभोज करून रविवारची सांगता करायची बस्स!

माझेखाद्याचेप्रयोग
स्प्रिंग ओनीयन चिकन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *