आज रविवार कामाचा दिवस –
दिमाग की बत्ती जलाव मच्छर भागाव …
बाजारात एक सुप्रसिद्ध क्रीम आहे.
ते लावलं की मच्छर चावत नाहीत.
पण ते किती सुरक्षित आहे हे अजून नक्की झालेलं नाही.
आज आपण शुद्ध सेंद्रिय मच्छर क्रीम घरीच बनवायचं.
अगदी सोपं आहे.
साहित्य –
50 ग्रॅम खोबरेल तेल
25 ग्रॅम आमसुल तेल
2.5 ml निलगिरी तेल
5 व्हिटॅमिन E कॅप्सूल
कृति –
हे क्रीम डायरेक्ट गॅसवर बनवायचं नाही.
एका फ्रायपॅन मध्ये पाणी घ्यायचं.
पॅन गॅसवर ठेवून पाणी गरम करायचं.
मग एका वाटीत खोबरेल तेल घेऊन वाटी पाण्यात ठेवायची.
तेल थोडं गरम झालं की त्यात आमसूल तेलाचे तुकडे टाकून चमच्याने ढवळत रहायचं.
दोन्ही एकजीव झालं की उतरून घ्यायचं.
आता या मिश्रणात निलगिरी तेल आणि Vit.E च्या कॅप्सूल फोडून त्यातला द्राव टाकायचा.
मिश्रण परत एकदा ढवळून थंड होऊ द्यायचं.
झालं की आपलं मच्छर क्रीम तयार!
हे एका डबीत भरून घट्ट झाकण लावायचं.
वासा मुळे मच्छर जवळ येत नाहीत हे गृहीतक आहे.
तुम्हाला निलगिरीच्या वास आवडत नसेल तर तुम्ही मंद सिंट्रोनेला ऑईल किंवा लव्हेंडर अत्तर वापरू शकता.
हे क्रीम लावलं तर मच्छर जवळ फिरकणारच नाहीत.
उन्हाळ्यामुळे त्वचा कोरडी पडते त्यासाठी आणि पायांच्या भेगांसाठी पण हे क्रीम वापरू शकता.
सेंद्रिय असल्यामुळे हे क्रीम मुलांसाठी सुद्धा निर्धोक आहे.
कर के देखो!
डॉ. दिलीप कदम, बार्शी