शास्त्रीय नाव: Bambusa arundinacea कुळ : poceae
बांबू ही वनस्पती गवत कुळातील असून तिचे आयुष्य शंभर वर्ष आहे. बांबू ही वनस्पती तिच्या जीवनक्रमात शंभर वर्षानंतर एकदाच फुले व फळे देते व नंतर बांबू पुर्णपणे वाळून जातो.
ओळखः
खोडः बांबूचे खोड २० ते ३० मीटर उंच वाढते. त्यांना फांदया नसतात. खोडावर पेरे असतात पेरे अनेक असून पेराच्या मधील भाग पोकळ असतो.
फुलेः लहान,असंख्य, साधी एकलिंगी असून फुलांचे अनेक घोस. फुलांना पाकळ्या नसतात.
फळेः लहान, मध्यभागी साधारण फुगीर, दोन्ही टोकाकडे निमुळते, बांबूच्या बियांना वेणुज म्हणतात.
औषधी गुणधर्मः
भाजीसाठी उपयोगी भागः कोवळया खोडांचे मांसल कोंब
१. कोवळया कोंबापासून तयार केलेले लोणचे अपचनात उपयोगी. भुक व पचन शक्ती वाढवते
२. कोवळे कोंब कुटून सांधेदुखीत बांधतात.
३. कोवळया कोंबाचा व पानाचा काढा गर्भाशयच्या आजारात उपयोगी व रक्तस्त्राव मध्ये उपयोगी ४. बांबूपासून बनवलेले वंशलोचन कफ, क्षय आणि दम्यात उपयोगी