लोहयुक्त भजीची पाने – मायाळू

रानभाजीः मायाळू

शास्त्रीय नाव: Basella alba कुळ : Basellaceae

मायाळू ही बहुवर्षायू वेल असून या वनस्पतीची बागेत, अंगणात, परसात तसेच कुंडीत लागवड करतात. मायाळूचे तांबडा व पांढरा असे दोन प्रकार आहेत.

तांबडा मायाळू

ओळख:

खोडः नाजुक खुप लांब, बारीक, उजव्या बाजूस गुंडाळणारे, मांसळ, हिरव्या रंगाचे असते.

फुले: पांढरी किंवा लाल रंगाची, लहान देठवरहित, पानाच्या बेचक्यात येणाऱ्या फळे गोलाकार, लहान वाटाण्याएवढी, लाल काळसर किंवा पांढऱ्या रंगाची औषधी उपयोगः

१. साध्यांच्या वेदना व सूज कमी करण्यासाठी लाभकारक

२. रक्तविकारात वाढलेली रक्तातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त

३. पित्तनाशक असून त्वचारोग आमांश व्रण यावर गुणकारी

४. कफकारक, मादक, ज्वरनाशक आणि पौष्टिक आहे.

५. केस गळती थांबविण्यासाठी उपयुक्त

६. मायाळू शोधशामक आणि मुत्रवर्धक आहे. मायाळूच्या पानांचा रस लोण्याबरोबर मिसळून भाजण्यावर व गरम पाण्याने पोळण्यावर आरामदायक वाटते.

मायाळूची भजी:

साहित्य:

मायाळूची अख्खी पाने स्वच्छ धुवून २ वाटी

बेसन अर्धी वाटी

लसून पेस्ट १ चमचा

तळण्यासाठी तेल १ वाटी

हिरची मिरचीची पेस्ट १ चमचा

मीठ चवीनुसार

हळद पाव चमचा

हिंग चिमूटभर

१. मायाळूची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत.

२. तेल सोडून साहित्यात दिलेले सगळे जिन्नस थोडे पाणी घालून मिक्स करावे. मिश्रण थोडे घटटच ठेवावे.

३. मग मायाळूचे एकएक पान भिजवलेल्या पिठात बुडवून गरम तेलात सोडावे. गॅसमध्यम ठेवावा.

४. थोडया वेळात भजी पलटून भजीला लालसर रंग आला की भजी तयार.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *