माझे खाद्याचे प्रयोग …
उपवासाच्या पुऱ्या …
आज कार्तिकी एकादशी.
उपवास करायची कोणतीही संधी आम्ही सोडत नाही, कारण त्यादिवशी मस्त कांही तरी खायला मिळतं.
आता आपण करायचं काय की ..
दोन वाट्या भगरीचं पिठ आणि दोन उकडून साल काढलेले मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे.
आता हे दोन्ही एकत्र करून चवी पुरतं मिठ घालून पिठ नीट मळायच.
बटाट्याच्या ओलाव्यातच पिठ मळलं जात,
पाणी अजिबात वापरायचं नाही.
मळलेलं पिठ जास्त वेळ ठेवायचं नाही लगेच लाटून पुऱ्या करायच्या आणि तळून घ्यायच्या.
बाकी बटाट्याची रस्सा भाजी आणि स्वीट म्हणून शेंगदाण्याचा लाडू तुम्हाला बनवता येतोच की.
अशा प्रकारे पुऱ्या,बटाटा भाजी आणि शेंगदाण्याचा लाडू यावरच सध्या पद्धतीने कार्तिकी एकादशी साजरी झाली.
विठ्ठल! विठ्ठल!! विठ्ठल!!
डाॅ. दिलिप कदम, बार्शी